Writer :- CA Atik Bhayani
Date : 05/08/2025
"बिल न भरल्यावर फौजदारी गुन्हा?"
हे वाचून खूप जणांना असा प्रश्न पडतोय —
"जर मी कोणाचं बिल (invoice) न भरलं, तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो का?"
होय, एका अलीकडच्या कोर्टाच्या निर्णयामुळे ही शक्यता आता चर्चेत आली आहे.
मी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून विविध कायदेशीर बाबी समजून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. अलीकडे मला एक केस खूपच वेगळी आणि विचार करायला लावणारी वाटली – Ms. Shikhar Chemicals v. State of U.P. & Another (2024).
एका कंपनीने ₹52 लाखांचे सामान दिले. त्यांना ₹47.75 लाख मिळाले, पण उरलेले ₹4.59 लाख थकीत राहिले. हे प्रकरण सिव्हिल कोर्टात न घेता त्यांनी थेट Section 406 IPC (trust breach) खाली फौजदारी गुन्हा दाखल केला.सामोरच्यांनी सांगितलं की हे तर कॉन्ट्रॅक्टचं(Contract) प्रकरण आहे, फौजदारी गुन्हा नाही. त्यांनी हे प्रकरण CrPC 482 अंतर्गत बंद करायला सांगितलं. पण कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं — "पुरावा बघून पुढे जाऊया."
ही केस म्हणजे कायद्याचं वेगळं रूप बघायला मिळालं. काही मुद्दे खास:
पण तरीही, Allahabad High Court ने इथे वेगळा विचार केला – परिस्थिती लक्षात घेतली.
तुम्हाला काय वाटतं या बद्दल?
तुमचं मत WhatsApp वर कळवा.
माझ्यासारख्याला ही केस एक विचार करायला लावणारी legal twist वाटली — आणि म्हणूनच शेअर केली!
Link to the order :-https://indiankanoon.org/doc/198539343/